ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिनगाव जहागीर येथील तरुणांनी अवैध दारू विक्रीविरुद्ध पुकारला एल्गार 

ठाणेदाराना निवेदन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

   तालुक्यातील सिनगाव जहागीर येथे अवैध रित्या विकल्या जाणाऱ्या देशीदारू च्या दुकानामुळे अनेकांचेसंसार उध्वस्त करणाऱ्या त्या दुकानदारा विरुद्ध तरुणांनी एल्गार पुकारला असून जर या पुढे गावात दारू विक्री झाली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर दारूबंदी विभाग हा सर्वस्वी जबाबदार राहतील असे निवेदनात म्हटले आहे .

वारंवार पोलिसांच्या कारवाईने गावातील अवैध देशी दारूची दुकाने बंद होत नसल्याने दारूबंदी अधिकारी फक्त अंधाची भूमिका घेत असल्याने सिनगाव जहागीर येथील तरुणांनी गेल्या दोन दिवसापासून गावातील अवैध देशी दारू दुकानावर चढ केली आणि त्रासलेल्या युवकांनी देशिदारू चे बॉक्स फोडून आता यानंतर दारू विकली तर ठोकशाही वापरून होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबदारी ही दारूबंदी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक बुलडाणा सह गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्यावर निश्चित निवेदन कर्त्यांनी केली आहे असे निवेदन ठाणेदार देऊळगाव राजा मार्फत दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये