ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासन सहकार्य करणार _ ए पी आय.आशिष रोही 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

संपूर्ण देशात जैन धर्मियांचे चोविसावे तीर्थंकर संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश देणारे श्री भगवान महावीर स्वामी यांचा 2624 वा जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे देऊळगावराजा शहरात सुद्धा सकल जैन समाजाच्या वतीने श्री भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याण महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून सकाळी प्रभात फेरीचे आयोजन त्यामध्ये विविध झाक्यांचे आयोजन त्यानंतर भगवंतांचा महामस्तकाभिषेक काही संस्कृत कार्यक्रम त्यानंतर सायंकाळी चार वाजता रथयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे सर्व धार्मिक कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी सकल जैन समाजातील मंडळी व जैन मंदिराचे ट्रस्टी यांची संयुक्तिक मीटिंग घेऊन जैन धर्मियांना या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येईल असे सांगून जैन समाजाला प्रभात फेरी व रथयात्रा दरम्यान काही समस्या असल्यास त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासित केले व प्रभात फेरी व रथयात्रा दरम्यान पोलीस बंदोबस्त देण्यात येईल असे सांगितले.

या बैठकीला कविश जिंतूरकर, मुकेश सिंगलकर, राहुल महाजन, ललेश अक्कबोटे, सन्मती जैन, संजय जिंतूरकर, संजय डोणगावकर, राजाभाऊ डोणगावकर, अमोल कछोट, सुनील सावजी, पियुष मांडोत, मयूर सावजी, अक्षय खडकपूरकर, अंकुर जिंतूरकर, उपस्थित होते सकल जैन समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे यावेळी मंदिराचे ट्रस्टी मुकेश सिंगलकर यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये