ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्रकार विनोद दोनाडकर यांचा सपत्नीक सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

तालुक्यातील बोढेगाव येथे माणिकादेवी पूजन व नागदिवाळी महोत्सवाचे औचित्य साधून माना समाजाच्या वतीने ब्रम्हपुरी तालुक्यात नावलौकिक असलेले, समाजातील विविध प्रश्नांना पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडणारे, गोरगरीब, सार्वसामान्य लोकांना न्याय मिळावा यासाठी नेहमी लेखणीच्या माध्यमातून झटणारे निर्भीड, निपक्ष पत्रकार विनोद शंकर दोनाडकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

पत्रकार विनोद शंकर दोनाडकर हे तालुक्यातील रणमोचन येथील रहिवासी असून ते दैनिक वृत्तपत्रामध्ये सन २००२ पासून पत्रकार म्हणून काम करीत आहेत. सुरुवातीला ते ग्रामीण प्रतिनिधी म्हणून काम करत होते. परंतु त्यांच्या उत्कृष्ट लेखणीची दखल घेत वृत्तपत्राच्या संपादकांनी त्यांची थेट ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली. ग्रामीण भागात काम करीत असतांना त्यांनी अनेक सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देत असतांनाच समाजात चाललेल्या काळ्या धंद्यांवर लेखणीने प्रहार करीत अंकुश लावला. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देत असल्यामुळे पत्रकार विनोद दोनाडकर यांची ग्रामीण भागात प्रचंड ख्याती आहे. सरळ-प्रेमळ स्वभाव व साधी राहणी असल्याने त्यांचे गोरगरीब सर्वसामान्य जनतेशी आपुलकीचे नाते आहे. त्यांच्या ह्याच कार्याची दखल घेऊन बोढेगाव येथील माना समाजाच्या वतीने माणिकादेवी पूजन व नागदिवाळी महोत्सवामध्ये त्यांचा व त्यांची पत्नी योगिता विनोद दोनाडकर यांचा शाल, श्रीफळ व साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोढेगावचे सरपंच मंगेश नन्नावरे, उपसरपंच नंदा नन्नावरे, ग्रा.पं.सदस्य रमेश नन्नावरे, विठ्ठल दर्वे, माना समाजाचे अध्यक्ष सुधीर नन्नावरे, सुनीता चौके, शिल्पा नन्नावरे, भारती नन्नावरे, चौके मॅडम, मोरेश्वर नन्नावरे, सुरेश मुलताने, प्रेमलाल धोटे, चरण गडे, अनिल नाकतोडे, ठाकरे ग्रामसेवक, राऊत सर, पांडुरंग दिघोरे, किशोर भोयर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये