ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बनावट पोलिसाने वृद्ध कृषी केंद्र संचालकला भर दिवसा लुटले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

पोलीस असल्याचे सांगत एका वृद्ध कृषी केंद्र संचालकाला भर दिवसा लुटल्या ची घटना 23 फेब्रुवारी ला सायंकाळी साडेचार वाजता देऊळगाव राजा शहरात घडली.

देवेंद्र बाबूलाल जिंतूरकर (67) हे आपल्या कृषी केंद्राकडे जात असताना एका अज्ञात व्यक्ती ने पोलीस असल्याचे सांगून दिशाभूल करून त्यांच्या हातातील अंगठी,व गळ्यातील सोन्याची चैन असा एकूण 35 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे,भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये