ताज्या घडामोडी

चंद्रपूर पोलीस अधीक्षकांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट – सायबर गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे दृश्य

नागरिकांनी सावध राहावे कुणीही फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नये - रविंद्र सिंह परदेशी ह्यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

देशात सर्वत्र सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून ओटीपी द्वारे नागरिकांच्या खात्यातील पैसे परस्पर काढून घेणे, महिलांचे अश्लील फोटो व व्हिडिओ प्रसारित करणे, फेसबुक खाते हॅक करून संबंधितांच्या नावाने पैशांची मागणी करणे यासह आधुनिक काळात आभासी विद्वत्तेच्या आधारे (Artificial Intelligence) थेट एखाद्या व्यक्तीच्या आवाजात फोन करून पैशांची मागणी करणे अथवा एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ मॉर्फ करून अश्लील चित्रफिती बनवणे नित्याचेच झाले आहे.

अशाच सायबर गुन्हेगारांचे मनोबल फारच वाढले असुन त्यांनी चक्क चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी ह्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले असुन ह्याद्वारे हे गुन्हेगार अधिक गंभीर गुन्हे देखिल घडवून आणू शकतात किंवा अपराध्यांना बेकायदा संरक्षण देण्याकरिता पोलीस अधीक्षकांच्या बनावट फेसबुक खात्याचा वापर करू शकतात. प्राप्त माहितीनुसार हे गुन्हेगार थेट पोलिस अधीक्षकांच्या नावाने असलेल्या बनावट खात्यावरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात येत आहे. यासंदर्भात पोलीस अधिक्षक रवींद्र सिंह परदेशी ह्यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार झाल्याचे मान्य केले आहे.

 

माझ्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले असुन माझ्या नावाने आलेली फ्रेंड् रिक्वेस्ट कुणीही स्वीकारू नये, मी कुणालाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत नसुन हे गुन्हेगारांचे कृत्य असल्याने त्या अकाऊंटला ब्लॉक करून फेसबुक ला रिपोर्ट करावे.

रवींद्र सिंह परदेशी      जिल्हा पोलिस अधिक्षक, चंद्रपूर

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये