ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्काऊट गाईड ही युवा चळवळ होय – कॅप्टन मोहन गुजरकर 

जागतिक स्काऊट दिन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘युवावर्गात सामाजिक जाणीव, देशप्रेम, साहस, शिस्त व कर्तव्याची जाणीव निर्माण करायची असेल तर त्यांना युवा चळवळीसोबत जोडून सातत्याने उपक्रमशील ठेवण्याची गरज आहे. या दृष्टिकोनातून स्काऊट गाईड ही उत्तम युवा चळवळ आहे, असे प्रतिपादन स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील ‘स्काऊट भवन’ येथे संपन्न झालेल्या ‘जागतिक स्काऊट दिन’ कार्यक्रमात रोव्हर लिडर तथा रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर यांनी 22 फेब्रुवारी रोजी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन मोहन गुजरकर तर प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ रोव्हर लिडर संतोष तुरक व रोव्हर लिडर प्रा. जगदीश यावले उपस्थित होते.

स्काऊट दिना’निमित्त एक दिवसीय प्रथमोपचार प्रशिक्षणाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. स्काऊट चळवळीवर रोव्हर शेखर भोगेकर, अक्षय जबडे, प्रतीक क्षीरसागर, प्रशिल अंदुरकर, श्रद्धा मडावी, साक्षी येळणे व साहिल रामगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जगदीश यावले यांनी मानले.

संचालन रेंजर कोमल शितळे हिने तर आभार रोव्हर लिडर संतोष तुरक यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये