ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोणी येथील पोटच्या मुलाने आईला संपविले तर वडील जखमी

घरगुती वादातून आई-वडिलावर कुराडीने वार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

लोणी:-कोरपना तालुक्यातील लोणी येथील एका मुलाने आपल्या वयोवृद्ध आई वडिलाला एका खोलीत बंद करून कुऱ्हाडीने वार केल्याची घटना आज 21 फेब्रुवारी रोजी दुपारी अंदाजे 2 च्या सुमारास घडली आहे. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी आहे.

उपचारासाठी वडीलाला कोरपना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक आहे.सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर फरार आरोपीला अटक करण्यात आल्याचे कळते.मनोज पांडूरंग सातपुते वय वर्ष अंदाजे 45, असे आरोपी मुलाचे नाव असल्याचे कळते. शेतीच्या ठेक्यातून मिळालेल्या पैशातून यांच्यात हा वाद झाला आणि या वादातून सदर घटना घडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

आरोपी मुलांने एका खोलीत आई आणि वडीलाला बंद केले आणि अत्यंत क्रूरतेने आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने ४ आणि हातावर २वार करून आईला जागीच ठार केला तर वडीलाच्या डोक्यावर २वार करून त्याला गंभीर जखमी करून वहीनीच्या मागे धावला, मात्र ती एका खोलीत लपवून अंदरून दरवाजा बंद केल्याने तिचा जीव वाचला.घटनेनंतर आरोपी मुलाने तेथुन पळ काढला मात्र पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.आता याप्रकरणी पुढे काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये