ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिंनगावं तालुक्यात अव्वल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

      मुख्यमंत्री माझीझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत सहभाग नोंदवून तालुक्यातून प्रथम येत जिल्हास्तरावर अव्वल येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आला असून निरीक्षण समितीने नियमावली नुसार मुद्दे तपासण्यात आले असून जिल्ह्यातही क्रमांक पटकावू असा मानस सरपंच सुनीता डोईफोडे यांनी बोलून दाखविला आहे.

 स्पर्धेत भाग घेतांना नगर पालिका ,खाजगी संस्था, आणि जिल्हा परिषद शाळा अशा तीन स्तरावर सहभागी झालेल्या शाळेत नगर पालिका शाळेतून श्री शिवाजी विद्यालय, खाजगी संस्थेच्या माध्यमातून देऊळगाव राजा शीक्षण संस्था देऊळगाव राजा ,तर जिल्हा परिषद शाळेच्या सात शाळांनी सहभाग नोंदवला त्यातून सिनगाव जहागीर ची जिल्हा परिषद शाळा ही तालुक्यातून प्रथम आली . दि २१फेब्रुवारी रोजी विभागीय स्तरावर जाण्यासाठी जिल्ह्याची टीम ही शाळेत तपासणी साठी आली असता सदर टीम मधे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी आर खरात,गजानन शेळके,गोपाल वाघ, जतेवाड शीक्षण विभाग बुलडाना, गटशिक्षणाधिकारी मुसदवाले देऊळगाव राजा केंद्रप्रमुख मेहुनाराजा हि टीम निरीक्षणा साठी आली होती स्पर्धेतील चाचणी नुसार आशादायक चित्र दिसून आले असून सरपंच सुनीता गजानन डोईफोडे, शालीकराम डोईफोडे, मुख्याध्यापक, शीक्षकवृंद   यांनी जिल्ह्यातुन विभागावर सिनगाव जहांगीर शाळा जाईल असा मानस बोलून दाखविला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये