ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कमल स्पोर्टीग क्लबच्या वतीने उद्या चंद्रपुरात शिवजयंती महोत्सवाचे आयोजन

ग्रँडमास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज व रविंद्र पाटील यांची विशेष उपस्थिती

चांदा ब्लास्ट

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व कीडा क्षेत्रास वाहून घेणाऱ्या कमल स्पोर्टीग क्लब, चंद्रपूरच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी साजरा करण्यात येत आहे. क्लबचे जिल्हाध्यक्ष, युवा नेता रघुवीर अहीर यांच्या विशेष पुढाकारातून होत असलेला हा शिवजयंती महोत्सव महानगरातील छ. शिवाजी महाराज चौक, छोटूभाई पटेल हायस्कुल समोर सायंकाळी ०६ वा. साजरा होणार आहे.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत होणाऱ्या या शिवजयंती महोत्सवास विख्यात कमांडो ट्रेनर, अॅक्शन, कोरीयोग्रॉफर व मोटीव्हेशनल स्पीकर शिफुजी शौर्य भारद्वाज व व्याख्याते रविंद्र पाटील यांची या सोहळ्यास विशेष उपस्थिती लाभणार आहे.

छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यांच्या शौर्याची गाथा व महाराजांनी रयतेच्या कृल्याणाकरीता केलेल्या कार्याची महती जाणुन घेण्यास या महोत्सवास मोठ्या संख्येने युवकै, युवती व शिवप्रेमी नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कमल स्पोर्टीग क्लब चंद्रपूरचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये