ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ,गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूरच्या वर्ग ९ वी कडून वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसाडे, राजेश मांढरे, सुरेश पाटील, माधुरी उमरे, राजेश वासेकर होते.

सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक सचिब स्व. हरिभाऊ डोहे गुरुजी, तसेच सावित्रीबाई फुले, सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी वर्ग १० वीच्या रचित करदोळे, तनू सावरकर, गुंजन वांढरे, कु. नयन चव्हाण, नम्रता गुंडले,पूजा राठोड या विद्यार्थ्यांनी शाळेप्रती तसेच शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक धर्मराज काळे तथा प्रमुख उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना एस. एस. सी. परिक्षेसंबंधी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी जी. एन. बोबडे, सुषमा शेंडे, नामदेव बावनकर, बि. एस. मरस्कोव्हें. राखुंडे यांचेसह सर्वशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी शशीकांत चन्ने, संकल्प भसारकर, लिलाधर मत्ते, यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाला वर्ग ९.वी १० वी चे विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी सामुहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन वर्ग ९ वीची विद्यार्थीनी कु. खिरटकर तर आधार रोहित मेश्राम याने मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये