ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी पूनम आघाव सुवर्ण, रोप्य व रोख पदकाने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

          डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील विद्यार्थ्यांनी पुनम आघाव ही नुकत्याच संपन्न झालेल्या प.दे.कृ.वि. च्या 38 व्या दीक्षांत समारंभात तीन सुवर्ण, एक रोप्य व दोन रोख अशी एकूण सहा पदकाने सन्मानित करण्यात आली.

     देऊळगाव राजा व परिसरातील भूमिपुत्रांना कृषी शिक्षणाचा लाभ व्हावा व त्या शिक्षणातून शेतकरी सुखी व्हावा या उद्देशाने समर्थ कृषी महाविद्यालयाची स्थापना संस्थेचे अध्यक्ष देवानंद कायंदे यांनी केली होती.

या महाविद्यालयाला मागील सात वर्षापासून अ दर्जा प्राप्त आहे तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण ही या महाविद्यालयाची ओळख आहे, याचेच फलित म्हणून महाविद्यालयाची विद्यार्थिनी व सध्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट अकोला येथे उच्च शिक्षण घेत असलेली कु पुनम आघाव हिला 38 व्या दीक्षांत समारंभात डॉ पंजाबराव देशमुख मेमोरियल सुवर्णपदक, श्रीमती विमलाबाई देशमुख रोप्य पदक, स्व. रेणुराव उर्फ अण्णासाहेब पाटील सुवर्णपदक, स्व गजानन पिंपरीकर मेमोरियल सुवर्णपदक, रोटरी इंटरनॅशनल डिस्टिक नंबर 314 बेस्ट युनिव्हर्सिटी स्टुडन्ट, मेहेरे बंधू रोख पारितोषिक बहाल करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, शिक्षण संचालक डॉ. श्याम सुंदर माने व कुलसचिव सुधीर राठोड यांनी अभिनंदन केले. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत पूनम आघाव हिने आपल्या यशाचे श्रेय समर्थ कृषिमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे व सर्व प्राध्यापक वृंद यांना दिले.

यावेळी विद्यापीठातुन प्रथम आल्या बद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष देवानंद कायंदे, सचिव सौ नंदाताई कायंदे, सहसचिव मनोज कायंदे, कोषाध्यक्ष सतीश कायंदे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे, प्रा नारायण बोडखे, प्रा मोहजीतसिंह राजपूत, प्रा विलास सातपुते, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.या दीक्षांत समारंभ प्रसंगी संपूर्ण विदर्भातील कृषी व संलग्न शिक्षण घेत असलेल्या एकूण 4040 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये