Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सद्गुरू जगन्नाथ महाराज व शिवलिंग प्राण प्रतिष्ठापना सोहळा

१५ व १६ डिसेंबरला भजन - किर्तन, गीत गायन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

         शहरातील स्थानीक गवराळा वॉर्ड भद्रावती येथील जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळाच्या वतीने नवनिर्मित मंदिरात जगन्नाथ महाराज व शिवलिंग मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा भव्य दिव्य स्वरूपात दिनांक १५ व १६ डिसेंबर रोज रविवार व सोमवार ला संपन्न होणार आहे. अथक परिश्रम घेऊन नवनिर्मित मंदिरात प्राण्रतिष्ठापना सोहळा निमित्त दिनांक.१५ रोज रविवारला सकाळी १० वाजता मूर्तीचे आगमन व प्रमुख अतिथी व जेष्ठ जगन्नाथ भक्तांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होऊन भाके महाराज यांच्या विधीवत पूजनाने मूर्ति प्राण्रतिष्ठापना सोहळा, दुपारी १ वाजता सौ. सुवर्णाताई पिंपळकर यांचा श्रवणीय किर्तन कार्यक्रम तसेच सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत भव्य शोभायात्रा पार पडेल.

 गुरुदेव भजन मंडळ तर्फे जागृती भजन कार्यक्रम होईल.

दिनांक १६ रोज सोमवारला महाआरती तर दुपारी ११ वाजेपासुन जेष्ठ सदस्य व विशेष योगदान देणाऱ्या सदस्यांचा सत्कार कार्यक्रम होईल. लगेच विविध भजन मंडळाच्या भजनावलीला प्रारंभ होईल. लगेच भव्य महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रकाश पिंपळकर यांचा साई म्युझिकल ग्रुप तर्फे सुमधुर संगीत पर्वणी चे विशेष आयोजन करण्यात आले आहे.

 सर्व भद्रावती कर जगन्नाथ भाविक, शिवभक्त यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ तर्फे करन्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये