ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या संकल्पनेतुन 4 फेब्रुवारीला देऊळगाव राजा येथे भव्य महारोजगार मेळावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या संकल्पनेतुन सुशिक्षित बेरोजगार युवक युवती साठी महा रोजगार मेळाव्याचे आयोजन 4 फेब्रुवारी ला सकाळी 9 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल,देऊळगाव राजा येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात 50 पेक्षा अधिक नामांकित कंपन्या मध्ये तरुणांना हक्काचा रोजगार मिळणार आहे,मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे नोंदणी अर्ज,व बायोडाटा असणे आवश्यक आहे,नोंदणी अर्ज देऊळगाव राजा येथील सातेफळ रोडवरील आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात तसेच सिंदखेडराजा येथील बस स्थानक जवळ असलेल्या नितीन जनरल स्टोअर येथे उपलब्ध असून बेरोजगार युवक युवतींनी या महारोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने (अजित पवार गट)करण्यात आले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये