ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गावातील तरुणांनी दारूच्या नशेत अटकवली दुर्गा देवी विसर्जनाची मिरवणूक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अतुल कोल्हे

                तालुक्यातील माजरी परिसरातील राळेगाव येथे दुर्गा विसर्जन करिता बंदोबस्तासाठी गेलेले पोशि रविंद्र गिते यांना व तेथील पोलीस पाटील दिवाकर ढोले यांना गावातील   काही दारू खास तरुण सुहास खामनकर, जगदिश वामन थेरे व शंकर सदाशिव आवारी यांनी दारुच्या नशेत पोलिसांची अरेरावी करुन विसर्जन  मिरवणुक  देवीची मिरवणूक थांबवली  व पोलीस प्रशासनाला आपला कर्तव्य बजवण्यास अटकाव केला.

दरम्यान पोलिसांची धाकधपडशा करुन त्यांना धकलधुकल केली. जगदिश वामन थेरे  व  शंकर सदाशिव आवारी या दोन तरुणांची वैद्यकीय तपासणी केली असता ते दारुच्या नशेत असल्याचा वैद्यकिय अहवाल प्राप्त झाला दरम्यान पोशि रविंद्र गिते यांचे तक्रारीनुसार सदर व्यक्तींवर माजरी पोलीस ठाणे येथे कारवाई करण्यात आली. सर्व आरोपींवर १०५/२३ कलम ३५३,३४ भादवि सहकलम ८५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पुढील तपास पोउपनि भोजराम लांजेवार हे करित आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये