ताज्या घडामोडी

नव्याने रुजु होताच ठाणेदारांनी लावला धडाका – मोबाईलचे दुकान फोडणाऱ्या अल्पवयीन आरोपीस चार तासात अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

मुन्ना खेडकर, बल्लारपूर

जिल्ह्यात अंत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बल्लारपूर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार असिफरजा शेख ह्यांनी रुजु होताच आपल्या कार्यकुशलतेची झलक शहरवासीयांना दाखविली असुन शहरातील रहदारीच्या मार्गावर असलेल्या मोबाईल दुकानातील चोरीचा अवघ्या चार तासात फर्दाफाश करून अल्पवयीन आरोपीला गजाआड करून नव्या शहरात धडाकेबाज सुरुवात केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, 7 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी नवनियुक्त ठाणेदार असिफरजा शेख यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार म्हणून पदभार स्वीकारला. नव्या थानेदरांना जणु आपली हुकूमत दाखविण्याच्या उद्देशाने त्याच रात्री बस स्टॅन्डच्या बाजूला असलेल्या व्यंकटेश एम्पायर मधील आर एम डी मोबाईल शॉपी चे शटर तोडून चोरट्यांनी एक ते दीड लाखाचे मोबाईल चोरून नेले.

घटनेची तक्रार दाखल होताच आपल्या कार्यकुशलतेने घुग्गुस येथे कायद्याचा वचक बसविणाऱ्या असिफराजा शेख ह्यांनी घटनेचे बारकाईने अवलोकन करून केवळ चार तासात चोरीचा पर्दाफाश करून एका अल्पवयीन आरोपीला अटक केली असुन ह्या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर गुन्हेगारांची माहिती घेण्याचे काम बल्लारपूर पोलीस करत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये