आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन
आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या जंगोदेवी देवस्थान येथे गेल्या वीस दिवसापासून यात्रेसाठी हजारो भाविक महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, मध्य प्रदेश व अन्य राज्यातून या ठिकाणी अनवाणी पायाने दिंडीच्या रूपात वाजत गाजत चालत येत असतात तर काहीजण वाहनाने येतात.
या ठिकाणी माता कंकाली देवी व माता जंगोदेवी गेल्या हजारो वर्षांपासून जागृत देवस्थान असल्याची माहिती देवस्थानचे पुजारी व स्थानिक भाविक देतात. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी या देवींचे दर्शन घेऊन आदिवासी बांधवांच्या उत्सवात सहभाग घेतला. स्थानिक नागरिक, भाविकांशी संवाद साधून येथे उपलब्ध सेवा, सुविधांचा आढावा घेतला. या ठिकाणी आ. सुभाष धोटेंच्या पुढाकाराने जंगो देवी पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता, नाल्यावरील ब्रिज, २७ सोलर इलेक्ट्रिक पॅनल, विद्युत सप्लाई व पिण्याच्या पाण्याची सोय हे महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून घेतले. त्यामुळे या परिसराचा कायापालट झाल्याचे व अजून उर्वरित इतर कामे करणार असल्याची प्रतिक्रिया धोटे यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, जीवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुणभाऊ निमजे, कैलास राठोड, सुग्रीव गोतावळे, सिताराम कोडापे, श्यामराव कोटनाके, जंगू येडमे, भोजू पाटील आत्राम, चंदू वेट्टी, दिवाकर वेट्टी, गोविंदराव कुंमरे, भाऊराव पाटील चव्हाण, डॉ. अंकुश गोतावळे, शामराव गेडाम, विलास पवार, अशपाक शेख, सुनील शेळके, दत्तात्रे तोगरे, भानुदास जाधव, उत्तम कराळे, नारायण वाघमारे, लहुजी गोतावळे, विजय राठोड, कैलास कुंडगीर, अनंता बावळे, रामदास रणवीर, मोतीराम उदे, सित्रू मडावी, कोटणाके बाजीराव, लका रामभाऊ चव्हाण, मारुती मोरे, गोविंद ठोंबरे, हरिचंद्र जाधव, रोशन मरापे यासह असंख्य कार्यकर्ते, भाविक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या सभेचे प्रास्ताविक सिताराम पाटील कोडापे यांनी केले तर आभार चंदू वेटी सर यांनी मानले.