ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रा. रवींद्र गुजरकर यांना ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार’

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील राष्ट्रीय सेवा योजनाचे जिल्हा समन्वयक प्रा. रविंद्र गुजरकर यांना 2023-24 चा ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी’ पुरस्कार बुलढाणा जिल्ह्य़ातील विवेकानंद आश्रम हिवरा येथे अमरावती शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक सिद्धेश्वर काळुसे यांच्या शुभहस्ते 5 फेब्रुवारी रोजी प्रदान करून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

सदर पुरस्कार विवेकानंद आश्रम हिवरा येथे राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रदान करण्यात आला असून सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जात असतो.

पुरस्कार वितरणाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमचे अध्यक्ष आर.बी. मालपाणी तर मंचावर रासेयो नागपूर विभागीय समन्वयक प्रा. विलास बैलमारे उपस्थित होते.

प्रा. रवींद्र गुजरकर हे सिंदी रेल्वे येथील रमाबाई वझुरकर नगर कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी व अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करीत असून त्यांना भारत स्काऊट व गाईडचा ‘उपराष्ट्रपती पुरस्कार’, नेहरू युवा केंद्राचा ‘जिल्हा युवा पुरस्कार’, जंगल बचावाकरीता ‘शौर्य पुरस्कार’ व उत्कृष्ट रोव्हर लिडर पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

आपल्या यशाचे श्रेय नगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अतुल टालाटुले, उपाध्यक्ष हरिभाऊ वझुरकर, सचिव डॉ. राजेंद्र पात्रीकर कोषाध्यक्ष अशोक दवंडे, सहसचिव निता टालाटुले, रासेयो विभागीय समन्वयक प्रा. विलास बैलमारे, रोव्हर स्काऊटचे राज्य समन्वयक कॅप्टन प्रा मोहन गुजरकर व प्राचार्य विलास येखंडे यांना देतात.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये