कुकुडसाथ येथे संत नारायण बाबा देवस्थानास सुभाषभाऊ धोटे यांची भेट
कार्यकर्त्यांशी सुसंवाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना :- कोरपना तालुक्यातील मौजा कुकुडसाथ येथील काँग्रेस कार्यकर्ते चंद्रकांत भोयर यांच्या शेतशिवारात असलेल्या संत श्री नारायण बाबा देवस्थानास चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी सदिच्छा भेट देत संत नारायण बाबा यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. निसर्गरम्य वातावरणात आयोजित या भेटीदरम्यान धोटे यांनी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधत स्थानिक प्रश्न, संघटनात्मक बांधणी आणि आगामी उपक्रमांबाबत चर्चा केली. ग्रामीण भागातील जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणे व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे हे पक्षाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कृ. उ. बा. स. संचालक संतोष इंदूरवार, कोरपना काँग्रेसचे शैलेश लोखंडे, सुधीर थिपे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष इर्षाद शेख यांच्यासह चंद्रभान भोयर, धर्मराज ताजणे, हेराम लोनगाडगे, लखमापूर चे सरपंच अरूण जुमनाके, अभिषेक गोरे, जयश्री गोरे, रोशन ठोंबरे, देवाजी आत्राम, सुदर्शन निबरांड, स्वप्नील काकडे, नंदकिशोर वदस्कर, भाऊराव मूठलकर, समीर भोयर, महादेव लोनगाडगे, सौरव आत्राम, साईनाथ देरकर, हेमंत झाडे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या भेटीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी नवचैतन्य मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



