गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्या होणाऱ्या विदेशी दारूची वाहतूक जप्त

एकूण 6 लाख 87 हजारावर माल जप्त

  चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 29.01.2024 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक हे वर्धा उपविभागीय कार्यालयात कार्यलयीन काम कामकाज करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली वरून आरोपी यांचेवर गजानन नगर वैद्य लेआउट, आर्वी नाका वर्धा येथे आरोपीचे घरासमोर नाकेबंदी करून यातील आरोपी नामे अविनाश रमेशराव वैद्य वय 40 वर्ष रा. वार्ड न. 6 वैद्य लेआउट, गजानन नगर, वर्धा जि. वर्धा यांचे वर प्रोव्हीशन रेड केला असता त्यांचे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती पाढऱ्या रंगाची चारचाकी होंडा सिटी कंपनीची झेड एक्स क्र एम.एच 31 सी.एन. 8847 किंमत अंदाजे 6,00,000/- रू त्या मध्ये 7 खरर्डयाचे खोक्यामध्ये रॉयल स्टैंग कंपनिच्या, ऑफीसर चाईस ब्लु, ऑफीसर चाईस, ओल्ड मंक कपंनीच्या दारूच्या अश्या वेग वेगळ्या कपनीच्या विदेशी दारूच्या शिश्या असा जु. की 6,87,850/- चा माल अवैध्यरित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आली.

सदरची विदेशी दारूचा माल कोठुन आणला या बाबत विचारपुस केली असता सदर विदेशी दारूचा माल हा नागपुर येथील अमरावती हायवे रोड वरील पि.व्ही. के वाईन शॉप मधुन आणला आहे सदर वाईन शॉपचे मालक यांचे नाव माहीती नाही असे सांगीतल्याने पि.व्ही. के वाईन शॉप चे मालक यांनी त्यांचे बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हात दारूबंदी असल्यासबंधी माहीती असताना सुध्दा वर्धा जिल्हातील आरोपी यास दारूचा माल देवुन त्यास सहकार्य केल्याने त्याचे कृत्य म.दा.का. कलम 82 प्रमाणे होत असल्याने सदर गुन्हयात वाईन शॉपचे मालक यांना आरोपी बनविण्यात आले आहे.

पोलीस स्टेशन रामनगर येथे आरोपीतांविरूध्द अपराध क्रमांक 61/2024 कलम 65 अ ई. 77 अ, 82, 83, म.दा. का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. रामनगर येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री प्रमोद के मकेश्वर सा. यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि संजय गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पो.शि, मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, रवि नरूले, सुमेश शेंद्ररे यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये