ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजर्षी शाहू जयंतीदिनी आरक्षण वर्गीकरणासाठी निवेदन मोहीम

सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्यचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी आज शाहू महाराजांना संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाकडून मानवंदना देण्यात आली. आणि राजर्षी शाहू महाराज यांनी १९०२ साली सुरु केलेल्या आरक्षणाचा लाभ प्रवर्गातील सर्वच जातींना व्हावा यासाठी आरक्षणाचे अ ब क ड असे उपवर्गीकरण झाले पाहिजे आणि उपवर्गीकरण झाले तरच प्रतिनिधित्वाचे शाहू महाराजांचे स्वप्न पूर्ण होईल, म्हणून सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व सर्वच तालुक्यातून मुख्यमंत्री यांना आरक्षणाचे वर्गीकरण करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक डॉ अंकुश गोतावळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार जिवती यांना मातंग समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी शिष्टमंडळात डॉ. पांडुरंग भालेराव, विजय गोतावळे, केशव भालेराव, दिगंबर तोगरे, किशोर तोगरे, दिगंबर आंबटवार, दत्ता जाधव, चक्रधर तोगरे आणि इतर समाजबांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये