ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अशोक सम्राट संघटनेच्या वतीने धरणा प्रदर्शन आंदोलन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धेमध्येच बनविण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक 24 जानेवारी वीर अशोक सम्राट संघटनेच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धेमध्येच बनविण्याबाबत इतवारा चौक इथे धरणा प्रदर्शन आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व केंद्र व राज्य सरकारचे आरोग्य मंत्री यांना निवेदन देण्यात आलं धरणा प्रदर्शन आंदोलन करत्या वेळी उपस्थित कार्यकर्ता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्की सवाई जिला अध्यक्ष अक्षय मानकर सिराज शेख कोमल झामरे विकास पुरोहित राहुल पाटिल गुड्डू शेख सभी कार्यकर्ता उपस्थित होते

विषय – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धेमध्येच बनविणे व नवीन 100 खाटांचे महिला रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्याबाबत._

महोदय जिल्हा शासकीय सामान्य रूग्णालय दवाखाना, 350 जास्त खाटांच्या वर असलेला हा वर्धा जिल्ह्यातील सर्वात मोठा दवाखाना आहे, येथे वर्धा जिल्ह्यातील सर्व जनता व सामान्य जनता विशेषतः ग्रामीण भागातील व तालुक्यातील सर्व व गो गरीब लोक शासकीय सामान्य रूग्णालयात अनेक वर्षांपासून उपचारासाठी दवाखाना येत आहे 100 खाटांचा नवीन महिला सामान्य रुग्णालय दवाखाना बांधण्यात आला आहे, त्यासोबतच कर्मचाऱ्यांची भरतीही झाली आणि कर्मचाऱ्यांचे पगारही सुरू झाले आहे, मात्र महिला सामान्य रुग्णालय दवाखाना अद्याप सुरू झालेला नाही. ,महिला सामान्य रूग्णालय दवाखाना लवकरात लवकर सुरू करण्यात यावे .जिल्हा शासकीय सामान्य रूग्णालय दवाखाना वर्धा जिल्ह्याचे हे 450 जास्त खाटांचे मोठे शासकीय सामान्य रूग्णालय दवाखाना असून, नियमानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्ध्यातच बनला पाहिजे . वर्धा जिल्ह्यातील 14 ते 15 लाख जनतेला त्याचा लाभ मिळेल आणि जनतेला चांगल्या आरोग्य सुविधांचा लाभ पण मिळेल व जुन्या जिल्हा परिषदेच्या जागेवर लवकरात लवकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बनविण्यात यावे . अशी आमची संघटनेची मागणी आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये