ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्राण्यांना कुरतेने वाहतुक करीत असलेले आरोपीतांनवर वर्धा उपविभागीय पोलीस पथक यांनी नाकेबंदी करून दोन गायची केली सुटका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, वर्धा यांना दिनांक 25.01.2024 रोजी आदीवास कॉलोनी रामनगर वर्धा येथे रात्रदरम्यान नाकेबंदी करीत असता काही वेळात एक पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन संशयीत रित्या येतानी दिसली त्या वाहनाला जवळील असलेल्या बॅटरीचे सहाय्याने सदर वाहन यास थाबंण्याचा इशारा केला असता सदर वाहन आमचे जवळ न थांबता पुढे जावुन वाहन थांबविले व वाहनाचे सामोरील दरवाजे उघडुन दोन अज्ञात इसम हे आंधाराचा फायदा घेवुन गली बोळीतुन पसार झाले मौक्यावर वरून एक टाटा कपंनीची सफारी पांढ-या रंगाचे चारचाकी वाहन क्र MH 14 EP 7775 किमंत 15,00,000/- रू तसेच त्या वाहनामधील एक नग लाल रंगाचा गोरा, एक नग पाढऱ्या रंगाची गाय अंदाजे वय 02 ते 03 वर्ष वयोगटातील किंमत अंदाजे 40,000/- रू. एकुण जुमला किंमत 15,40,000/- रु. चा माल मिळुन आला. वरून पंचनामा कार्यवाही करण्यात आली.

पोलीस स्टेशन रामनगर, वर्धा येथे अपराध क्रमांक 51/ कलम 11 (1) (घ) (ड) (झ) 2024 प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चा गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशन चे अधिकारी व क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विषेश मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री प्रमोद के मकेश्वर सा. यांचे सुचनेप्रमाणे, पो. उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.उप.नि परवेज खॉन, पो. हवा अमर लाखे, पो.शि. पवन निलेकर, मंगेष चावरे, समीर शेख, यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये