ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेच्या शासन निर्णयातील शिथिलतेत वाढ करा

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

चांदा ब्लास्ट

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन राज्य शासनाने 75 हजार पदभरतीची प्रक्रीया सुरु करण्याचे घोषित केले होते. त्याकरीता कोरोना व इतर कारणाने सरळ सेवा भरती न झाल्याने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत खुल्या प्रर्वगाकरीता 40 वर्ष व इतर मागास प्रर्वगाकरीता 45 वर्ष वयोमर्यादेत शिथिलता करुन दोन वर्ष कमाल मर्यादा वाढविण्यात आली होती.
त्याकरीता राज्य शासनाने दि. 03 मार्च 2023 रोजी शासन निर्णय देखील प्रसिद्ध केला. परंतू राज्य शासनाच्या अनेक विभागाच्या जाहिराती अद्यापही प्रसिद्ध न झाल्याने सरळ सेवेच्या नियुक्तीची प्रक्रीया थांबली आहे. त्यामुळे शासन सेवेत सरळसेवेने  नियुक्तीसाठीच्या    कमाल  वयोमर्यादेच्या शासन निर्णयातील शिथिलतेत वाढ करुन दि. 31 डिसेंबर 2024 याप्रमाणे सुधारणा करावी, अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
विशेष म्हणजे राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. त्यात अनेक वर्षानंतर आता सरळसेवा भरती निघत आहे. त्यामुळे युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. परंतु मागील दोन वर्ष कोरोना काळ असल्यामुळे अनेक युवकांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता हा काळ हातून गेला. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात सरळसेवा भरती निघणार आहे. त्यामुळे आता या परिपत्रकाची तारीख संपत असल्यामुळे हजारो युवक भरती प्रकीयेपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे आता करायचे काय असा प्रश्न या युवकांपुढे पडला आहे.
त्यामुळे शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठीच्या    कमाल  वयोमर्यादेच्या शासन निर्णयातील शिथिलतेत वाढ करुन दि. 31 डिसेंबर 2024 याप्रमाणे सुधारणा करावी. अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये