ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बालाजी मंदिरासमोर दीपोत्सव साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शहरातील बालाजी मंदिरासमोर दीपोत्सव साजरा करून रामभक्तांनी अयोध्या येथील श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने आनंदोत्सव साजरा करण्यात आला, यानिमित्ताने गावातील महिलांनी श्री बालाजी मंदिरासमोर रांगोळ्या काढून दिव्यांची आरास केली,यावेळी रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते, गावात विविध ठिकाणी फटाक्यांची प्रचंड आतिषबाजीबालाजी मंदिरासमोर दीपोत्सव साजरा करण्यात आली, जय श्रीराम च्या गजराने संपूर्ण शहर दुमदुमून गेले.

बालाजी मंदिरासमोर भाविकांनी दुपारी महाआरती केली,विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसा चे सामूहिक पठण केले,सायंकाळी मंदिर परिसरात व गावात घरोघरी रांगोळी काढून दीप प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये