ताज्या घडामोडी

नागपूर येथे शालेय संगणक प्रशिक्षकांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई, च्या अनुषंगाने प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना आधुनिक युगामध्ये शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होण्यासाठी आय सी टी उपक्रमाद्वारे डिजिटल साधनाचा योग्य पद्धतीने वापर करता यावा यासाठी प्राथमिक शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळांची उभारणी करून देण्यात आली आहे.

त्या संगणक प्रयोगशाळांवर नेमण्यात आलेल्या प्रशिक्षकांना नागपूर येथे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशेळेस वर्धा येथिल शिक्षणाधिकारी सचिन जगताप, भंडारा जिल्ह्याचे समग्र शिक्षा अभियान जिल्हा समन्वयक वीरेंद्र गौतम उपस्थित होते. प्रफुल बारेकर ह्यांच्या कुशल प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी राजकुमार हिवारे शिक्षणाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्याचे सर्व संगणक प्रशिक्षक प्रशिक्षण स्थळी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये