गडचांदूर येथे औषध विक्रेत्यांची कार्यशाळा संपन्न
चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल , चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व कोरपना, राजुरा, जिवती केमिस्ट असोसिएशन व ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर तर्फे साकारण्यात आलेली एक दिवसीय फार्मसीस्ट रिफ्रेशर्स कोर्सची कार्यशाळा रविवार दिनांक २१ जानेवारी रोजी गडचांदूर येथील लक्ष्मी टॉकीज सभागृहात पार पडली.
ए आय ओ सी डी व एम एस सी डी ए चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे उपाध्यक्ष मुकुंद दुबे, महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा राज्यभर राबवण्यात येत आहे. या कार्यशाळेला महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष मुकुंद दुबे, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद सदस्या सोनाली पडोळे, चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल एकरे, उपाध्यक्ष रवी आसुटकर, सहसचिव अनुप वेगिनवार ह्यांचेसह कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सेवानिवृत्त औषधी निरीक्षक पी एस बल्लाळ, औषधी निरीक्षक नालंदा उरकुडे, प्रा.दिनेश बियाणी, अशोका इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य महेश हाळके, हायटेक फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक सतीश मोहीतकर, पी सी आय चे भूषण माळी, कोरपना तालुका अध्यक्ष पराग जकाते, सचिव विनोद चटप, राजुरा तालुका अध्यक्ष हितेश डाखरे, सचिव धनंजय बोबडे, जिवती तालुका अध्यक्ष मुजाहिद देशमुख, सचिव मधुसूदन कदम आदी उपस्थित होते. कार्यशाळेला कोरपना, राजुरा, जिवती तालुक्यातील केमिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिन पिंपळकर यांनी केले.