ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय दूध संकलन केंद्र शासनाच्या तुघलकी कारभारमुळे बंद

दूध संकलन केंद्रासमोर आंदोलन करून तहसीलदार चव्हाण साहेब यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड येथे शासकीय दूध संकलन केंद्र होते मात्र शासनाच्या तुघलकी कारभारमुळे बंद पडले. यानंतर खाजगी दूध कंपनी यांनी आपलें संकलन सुरु केले. कोर्धा येथे दिनशा दूध केंद्राचे माध्यमातून दूध संकलन केले जाते मात्र आज दूध शेतकऱ्यांनी आपल्याला आपलें दूध विकले जाते तें खर्च वजा परवडत नाही यामुळे आज दूध बंद करून आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रति लिटर ५०/रुपये दर देण्यात यावे, दूध शेतकऱ्याला जनावरांना लागणारे औषध /पोषण आहार कमी किंमतीत उपलब्ध करून द्यावे. दूध संकलन केंद्रावर शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशा अनेक मागण्याची मागणी करत दूध संकलन केंद्रासमोर आंदोलन करून तहसीलदार चव्हाण साहेब यांना निवेदन देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये