ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमरावती जिल्ह्यातील १०० अधिकाऱ्यांनी केला जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीचा दौरा

गावातील विविध उपक्रमांची केली पाहणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान २०२३-२४ अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सीईओसोबत 100 पदाधिकारी, अधिकारी, ग्रामसेवक व सरपंच मंडळींनी शुक्रवारी जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे अभ्यास दौरा केला असून विविध उपक्रमांची पाहणी केली.

        अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी महसुली विभागाबाहेर दर्शन ग्रामपंचायतीचा अभ्यास दौरा करण्यासंदर्भात अमरावती जिल्हा परिषदेची आराखड्यात तरतूद होती. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बिबी, आनंदवन, मंगी, राजगड, जुगनाळा व मोहुर्ली इत्यादी आदर्श व स्मार्ट गावात दौरा आयोजित करण्यात आला होता.

      जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे विद्यापीठ आपल्या गावी, बांबू प्रकल्प, वनपंचायत, पाणी पुरवठा योजना, गावातील पायाभूत सुविधा व गावाशी संबंधित इतर गोष्टींचे अवलोकन केले. यावेळी अमरावती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्यासह १०० पदाधिकारी, अधिकारी, ग्रामसेवक व सरपंच उपस्थित होते. सरपंच माधुरी टेकाम, उपसरपंच आशिष देरकर, ग्रामविकास अधिकारी धनराज डुकरे यांच्यासह गावातील नागरिकांचा यावेळी मोठा सहभाग होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये