ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय धान खरेदी केंद्रावरील धानांचे चुकारे तातडीने जमा करा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा शेखर प्यारमवार

           सावली तालुक्यामध्ये मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सेवा सहकारी संस्था मार्फत धान खरेदी केल्या जाते तालुक्यामध्ये पाच खरेदी केंद्र असून संबंधित केंद्रावर 20000 क्विंटल धान खरेदी केल्या गेल्या आहेत. धान खरेदी करून एक ते दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. तरी अजूनही धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही.शेतकऱ्यांच्या धानाच्या भरोशावरच सर्व आर्थिक व्यवहार होत असतो,पैसे जमा न झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक बजेट कोलमंडलेला आहे.आदिवासी महामंडळामार्फत होणाऱ्या खरेदीची चुकारे जमा होत आहेत.

परंतु मार्केटिंग फेडरेशन मार्फत होणाऱ्या खरेदीचे चुकारे प्रलंबित आहेत तरी आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांकडे जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय तसेच खासदार साहेब यांनी तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांचे प्रलंबित चुकारे तातडीने जमा करण्याचे आदेश देण्याचे करावे अशी मागणी अशोक ठीकरे (संचालक कृ. उ. बा. स. सावली), तुकाराम ठिकरे, दिलीप ठीकरे व आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये