ताज्या घडामोडी

घोडपेठ येथे ग्रामपंचायत कर्मचारी इंदू कुंमरे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती :-
15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील घोडपेठ येथील सेवानिवृत्त कर्मचारी इंदू कुंबरे यांचा ग्रामपंचायत कार्यालयात येथील सामाजिक कार्यकर्ते तथा गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य अशोक येरगुडे यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी पार पडलेल्या एका कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अशोक येरगुडे, सरपंच अनिल खडके, उपसरपंच प्रदीप देवगडे, ग्रामपंचायत सदस्य देवा शंखावार, सदस्य ज्योती मोरे, रुपा बावणे ,गेडाम मॅडम ,मंदा बोबडे ,वनिता सावे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी अशोक गरगुडे यांचे हस्ते ईदू कुमरे यांना साडी- चोळी, पुष्पगुच्छ ,शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. ईदू कुमरे यांनी घोडपेठ ग्रामपंचायत येथे कार्यरत असताना गावातील समस्याचे निवारण करण्यासाठी आपल्या कारकीर्दीत प्रामाणिकपणे काम केल्याचे अशोक येरगुडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी अन्य मान्यवरांनी सुद्धा आपआपले मनोगत व्यक्त केले .
सदर कार्यक्रमाचे संचालन ग्रामपंचायत सदस्य गेडाम मॅडम यांनी तर आभार ग्रामविकास अधिकारी नगराळे यांनी मानले सदर कार्यक्रमाला घोडपेठ येथील ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये