ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूरात एका आठवड्यात पोस्को अंतर्गत दोन गुन्हे दाखल

आरोपी बॉडी बिल्डर अनीस खान व मुनीर सादिक शेख यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूरात एकाच आठवड्यात पोस्को अंतर्गत दोन गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी दोघाही आरोपींचा मुसक्या आवळल्या आहे. पहिल्या घटनेत गडचांदूर येथील पुरस्कार प्राप्त आरोपी बॉडी बिल्डर अनीस खान (२८) याने सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे वीडियो ठेऊन तिचा बद्दल अपशब्द लिहिले होते. काही दिवसानंतर त्याच्या मित्राने सोशल मीडियावर तेच वीडियो पोस्ट केले.

याबद्दल मुलींच्या पारिवाराला लोकांकडून माहिती मिळताच पोलिसात तक्रार करण्यात आली. मित्राने सदर वीडियो अनीस खान कडून मिळाल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बॉडी बिल्डर आरोपी अनीस खान (२८) याला अटक केली असुन त्याच्यावर आयटी एक्ट व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अनीस खानला पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला १५ दिवसांचा एमसीआर दिल्याची माहिती मिळाली आहे.

   काही दिवसापूर्वीच घडलेल्या दुसऱ्या घटनेत नवव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या विवाहित एसटी बस वाहका विरुद्ध गडचांदूर पोलिसात पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिवती तालुक्यातील एका १४ वर्षाची विद्यार्थिनी गडचांदूर येथे शिकत आहे. ती दररोज एसटीने यायची, एसटी बस वर वाहक म्हणून असलेला मुनीर सादिक शेख हा तिच्या सोबत नेहमी बोलत असल्याने त्यांची ओळखी वाढली. काही दिवसानंतर मुनीर ने तिला प्रपोज केले. मात्र त्या विद्यार्थिनीने याकडे दुर्लक्ष केले. मात्र शाळेत रोज त्याच एसटी बसने येणे जाणे करावे लागत असल्याने दोघात बोलचाल सुरू झाली. एकेदिवशी तो तिला भेटासाठी शाळेकडे दुचाकी घेऊन आला.

दि. १० ला दुपारी लवकर सुट्टी झाली आणि तो शाळेजवळ दुचाकी घेऊन मुलीची वाट पाहत उभा होता. शाळेला सुट्टी होताच त्याने तथाकथितपणे मुलीला दुचाकीने सोडण्याच्या बहाण्याने बसविले दोघेही विसापूर मार्गे जात असल्याचे गावातील नागरिकांना दिसले. याबाबत मुलीच्या आईला माहित होताच गडचांदूर पोलीस गाठून एक विवाहित पुरुष माझ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक करीत असल्याची तक्रार मुलीच्या आईने दिली. पोलिसांनी आरोप असलेल्या एसटी बसवाहक मुनीर सादिक शेख (३२) याला अटक केली असुन त्याच्यावर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

     पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्यातरी सध्याची सामाजिक व राजकीय परिस्थिती बघता आरोपी एका विशिष्ट समाजाचे असल्याने चर्चेला उधाण आले आहे. शाळेत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलींच्या बाबतीत अश्या घटना घडत असल्याने येथील पालक आणि नागरिकांत प्रचंड रोष निर्माण होत आहे. दोर्षीवर युवाकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानीय नागरिकांकळून होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये