ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामीण क्षेत्रातील युवा व पुरुषांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश सुरूच

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

           भद्रावती तालुक्यातील कोंढा, चालबर्डी, मांगली येथील असंख्य युवा, पुरूषांनी विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे तथा तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांच्या नेतृत्वात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्षप्रवेश घेतला.

            शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख नेते आमदार भास्करजी जाधव यांचे मार्गदर्शनात, पुर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख व विभागीय प्रवक्ता प्रा.सौ. शिल्पाताई बोडखे यांचे सुचनेनुसार, व वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे तथा उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांचे मार्गदर्शनात तसेच तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांचे नेतृत्वात कोंढा, चालबर्डी, मांगली येथील असंख्य युवा, पुरूषांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्षप्रवेश केला.

         रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांच्या पुढाकाराने चालबर्डी (कोंढा) येथील दिलीप कूरेकार, सुरेश चिकटे, अतुल मोरे, कोंढा येथील सुनिल काळे, विठोबा चामाटे, कोंढा नविन वस्ती येथील अशोक पिंपळकर, मांगली येथील बंडु ढेंगळे, भद्रावती येथील अशोक नेहारे, सुशांत देवगडे तसेच मनोहर वर्मा, मारोती निमकर, चंद्रभान टोंगे या युवा, पुरूषांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) भद्रावती तालुका कार्यालय “शिवनेरी” येथे शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला.

             याप्रसंगी तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांच्या सोबत शहर प्रमुख घनश्याम आस्वले, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, माजी नगरसेवक प्रशांत कारेकर, युवासेना तालुका अधिकारी राहुल मालेकर, गौरव नागपूर तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये