ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऊर्जा ग्राम परिसरातील किराणा दुकानात चोरी

भद्रावती पोलिसात तक्रार दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

               दुकानाची भिंत फोडून अज्ञात चोरट्याने एका किराणा डेली नीड्स दुकानातून साडेपाच हजार रुपयांचा माल लांबविला. सदर घटना दिनांक 17 रोज बुधवार ला मध्यरात्री नंतर घडली. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून भद्रावती पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या दुकानात चोरी होण्याची ही चौथी वेळ असून याआधी या दुकानात तीनदा चोरी झाली होती. सुनील डाहुले यांचे तालुक्यातील ऊर्जा ग्राम येथील बसस्थानकाजवळ मृगनयनी किराणा तथा डेली निडस दुकान आहे. घटनेच्या दिवशी सुनील डाहुले हे आपले दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांना आढळून आले.

अज्ञात चोरट्यांनी दुकानाची भिंत फोडून दुकानात प्रवेश केला व दुकानातील विविध अशा साडेपाच हजार रुपयांच्या वस्तू लांबविल्या. या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये