ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिट अँड रन विरोधात देऊळगाव राजा येथे रस्ता रोको

एकता चालक संघटना आक्रमक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

केंद्र सरकारने नुकताच पारित केलेला हिट अँड रन हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी एकता चालक संघटना देऊळगाव राजा चे अध्यक्ष शेख कदिर यांच्या नेतृत्वाखाली चालकांनी स्थानिक बस स्थानक चौकात 15 जानेवारी ला रस्ता रोको आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले,

केंद्र सरकारने हिट अँड रन हा कायदा पारित केला आहे, त्या मध्ये वाहन चालक कडून जर अपघात झाला तर 10 वर्षाची शिक्षा व 7 लक्ष रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे,हा कायदा वाहन चालक तसेच मालकावर अन्यायकारक असल्याने 20 जानेवारी पावेतो केंद्र सरकारने हा कायदा जर रद्द केला नाही तर सर्व वाहन चालक रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असे निवेदनात म्हटले आहे,

तहसीलदार श्याम धनमणे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले, निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष शेख कदिर,अजीम खान,मारुती खांडेभराड,अल्ताफ खान कोटकर, राजेश इंगळे,सुभाष दराडे,रोशन खान,रफिक पठाण यांच्या स्वाक्षरी आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये