ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये व्यक्तिमत्त्व शिबिराचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये विद्यापीठाच्या निर्देशानुसार दिनांक 15 जानेवारी ते 20 जानेवारी 2024 दरम्यान व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागद्वारे करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन दिनांक 15 जानेवारी रोजी करण्यात आले. उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. अनिल चिताडे, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हजर होते. अश्या प्रकारच्या कार्यक्रमातून अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थि कौशल्य विकसित करून आजच्या खाजकिकरणाच्या टिकून राहू शकतील.असे वकतव्य त्यांनी केले.

कार्यक्रमाचे मुख्य व्यक्ता म्हणून ॲड. दीपक चटप यांनी व्यक्तिमत्त्व विकास आणि शिक्षणाचा उपयोग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या महापुरुषांनी शिक्षणासाठी जे प्रयत्न केले, त्यातून आज आपल्याला शिक्षणाची संधी प्राप्त झाली. मात्र आजची पिढी ते शिक्षण जपण्यास असमर्थ ठरत असल्याचे जाणवते. म्हणून आपले व्यक्तिमत्त्व हे महान व्यक्तींना अपेक्षित प्रमाणे बनवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मत ऍड दीपक चटप यांनी मांडले. दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून श्री विठ्ठल रावजी थिपे, उपाध्यक्ष गडचादुर शिक्षण प्रसारक मंडळ प्रामुख्याने उपस्थित होते.

या शिबिराचे आयोजक विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ अजय कुमार शर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शैलेन्द्र देव हे होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ संदीप घोडीले यांनी तर आभारप्रदर्शन श्री. मनोहर बांदरे ग्रंथपाल यांनी केले. विद्यार्थ्यानी मोठ्या प्रमाणात हजर राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये