ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युवा नेते वरुण पांडे यांची भारतीय जनता पार्टी अ. जा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  वर्धा जिल्ह्यातील युवा नेते वरुण गोकुल पांडे यांची भारतीय जनता पार्टी अ.जा मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदावर नियुक्ती आज, 25 जानेवारी 2024 रोजी तात्काळ प्रभावाने जारी करण्यात आली आहे. याआधी वरुण पांडे यांनी वर्धा जिल्हा भाजप अ. जा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाचा यशस्वी कार्यकाळही पूर्ण केला होता.

 वरुण पांडे यांच्या या नियुक्तीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. या संघटनात्मक नियुक्तीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचे संदेश येत आहेत.

त्यांच्या नियुक्ती संदर्भात त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय जनता पार्टी (महाराष्ट्र) अ. जा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजप महाराष्ट्र संयोजक प्रसाद लाड, वमाजी खासदार दत्ताजी.मेघे, माजी आमदार सागर मेघे, आमदार समीर मेघे, ययांचे आभार मानले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये