ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रासेयोच्या विद्यार्थ्यांनी समाज कार्यात सहभाग घ्यावा – प्रा. विजय आकनुरवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजीक जाणीव निर्माण झाली पाहिजे त्यातूनच त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी ते पुढे आले पाहिजे याकरिता रासेयोच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी समाज कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन रासेयोचे माजी जिल्हा समन्वयक तथा सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी केले ते मूल तालुक्यातील बेंबाळ येथील विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयात आयोजित केलेल्या रासेयोच्या विध्यार्थी कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते त्यानी यावेळी ग्रामीण विकासात युवकांचे योगदान या विषयावर सुध्दा मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यशाळा व भूगोल दिन हे दोन्ही कार्यक्रम यावेळी घेण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या कमल हिरादेवे या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सोनाली उमक,प्रा सुभाष सोनूले,प्रा प्रफुलचंद भसारकर आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेची विधीवत पूजा व मालार्पण करण्यात आले.

कार्यक्रमात प्राचार्या कमल हिरादेवे यांनी भूगोल दिनाबद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सोनाली उमक यांनी केले संचालन प्रा लोमेश देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संघपाल रामटेके यांनी केले या कार्यक्रमाला मोठया संख्येनी विद्यार्थी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये