धक्कादायक : देवळी येथील नायब तहसीलदार अँटी करप्शन ब्युरो (ACB) च्या जाळ्यात
तीन हजारांची लाच घेताना केली अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
देवळी येथील नायब तहसीलदार किशोर प्रभाकरराव शेंडे वय 51 वर्ष यांनी फिर्यादीला 5000/- हजार रुपयांची लाच मागितली होती तर तुमचं काम होईल म्हणून फिर्यादी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा येथे धाव घेतली असून ही घटना सांगितली त्यानंतर आज मंगळवारी तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. किशोर शेंडे असे “त्या” लाचखोर नायब तहसीलदारांचे नाव असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
देवळी येथील एका इसमाच्या शेतीच्या आपसी वाटणीपत्रासाठी नायब तहसीलदार किशोर शेंडे यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु सदर इसमाची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता “शेंडे” यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देवळी येथील तहसील कार्यालयात सापळा रचला आणि तीन हजार रुपयांची लाच घेताना नायब तहसीलदार किशोर शेंडे यांना रंगेहात अटक केली. याप्रकरणी त्यांच्यावर देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. एक दिवस पोलीस कस्टडीत देण्यात आली होती.उद्या बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
सदरची कार्यवाही श्री. राहुल माकणीकर (पोलीस अधीक्षक राजपूत निष्पद प्रतिबंधक विभाग नागपूर), संजय पुरंदरे(अप्पर पोलीस अधीक्षक), सचिन कदम (आपण पोलीस अधीक्षक) तसेच अनामिका मिर्झापूर, याच्या पोलीस निरीक्षक, लाप्रवी. नागपूर, यांचे मार्गदर्शनास अभय अष्टेकर, पोलीस उपाधीक्षक, पो हवा. संतोष बावनकुळे, पोका. कैलास वाल्दे, प्रीतम इंगळे, प्रशांत मानमोडे, चालक नापोशी निलेश महाजन, सर्व लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धा यांनी केली आहे.