ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात प्रसारमाध्यमांसाठी लेखन कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

गोंडवाना विद्यापिठ गडचिरोली संलग्नीत राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येते ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद या अभ्यासक्रमातंर्गत प्रसारमाध्यमांसाठी लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला साधनव्यक्ती डाॅ. चैतन्य शिनखेडे, मिलिंद उमरे उपस्थित होते.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐ.चंद्रमौली तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये प्रशांत वासाडे, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. रामचंद्र वासेकर उपस्थित होते. कार्यशाळेच्या पहिले सत्र आधुनिक युगातील माध्यम लेखन संधी व मार्ग या विषयावर डाॅ. चैतन्य शिनखेडे यांनी पत्रकारितेचा इतिहास आणि आधुनिक माध्यमातून कशाप्रकारे संधी आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले तर दुसऱ्या सत्रात ग्रामीण पत्रकारिता संधी व आव्हाने या विषयावर मिलिंद उमरे यांनी ग्रामीण पत्रकारितेचा स्वरूप व वृत्तलेखन कशा प्रकारे करायचे यावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. ऐ.चंद्रमौली अध्यक्षस्थानावरून समयोचित मार्गदर्शन केले डॉ. रामचंद्र वासेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर कार्यक्रमाचे संचालन किशोर बोरकुटे यांनी केले.

उपस्थितांचे आभार आशाली मोहुर्ले हिने मानले. यावेळी डॉ. विजयसिंग पवार, प्रा.पुंडलिक शेंडे, प्रा. प्रियंका बगमारे, प्रा.सोनी दुधे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये