ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री संत झिंगुजी महाराज यांच्या ८४ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

दि. १९,२० व २१ डिसेंबरला विविध धार्मिक व मनोरंजक कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

                   श्री संत झिंगुजी महाराज देवस्थान समिती भद्रावतीचे वतीने श्री संत झिंगुजी महाराज यांच्या ८४ पुण्यतिथी महोत्सवाचे तथा विविध धार्मिक व मनोरंजक कार्यक्रमाचे दि. १९, २० व २१ डिसेंबरला स्थानिक श्री संत झिंगुजी महाराज (मठ) देवस्थान येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

     मंगळवार दि.१९ डिसेंबरला सकाळी ५ वाजता घटस्थापना व श्री ची पूजा आरती, सकाळी ८ वाजता नगर स्वच्छता अभियान, सकाळी १० वाजता भजनाचा कार्यक्रम, दुपारी १२ वाजता रांगोळी स्पर्धा, सायंकाळी ५ वाजता साईप्रकाश म्युझिकल ग्रुप भद्रावती तर्फे भजन संध्या, सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. श्री सावता केशव फुले रा. सनसर ता. इंदापूर जि. पुणे यांच्या भारुडाचा कार्यक्रम. रात्री १०:३० वाजता जागृती भजन होईल.

   बुधवार दि. २० डिसेंबरला सकाळी ६ वाजता श्री ची पूजापाठ व आरती, सकाळी ८ वाजता योग्या नेत्रालय व सर्जिकल सेंटरचे नेत्र शल्य चिकित्सक डॉ .प्रशांत नागपुरे व डॉ. मोनिका नागपुरे यांच्या सौजन्याने भव्य नेत्र तपासणी शिबिर, सकाळी १० वाजता रक्तगट तपासणी शिबिर ग्रामीण रुग्णालय भद्रावती यांचे सौजन्याने, दुपारी १ वाजता श्री संत झिंगुजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रवचनकार सविता दिघोरे भद्रावती यांचे प्रवचन, दुपारी ४ वाजता भजन, सायं. ६ वाजता सत्कार समारंभ प्रशस्तीपत्र व बक्षीस वितरण तसेच गौरव रत्नांचा सत्कार कार्यक्रम होईल.या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री दिल्ली, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी खासदार हंसराजभैया अहिर, आ. प्रतिभाताई धानोरकर भद्रावती – वरोरा विधानसभा क्षेत्र, तहसीलदार अनिकेत सोनवणे, ठाणेदार बिपीन इंगळे, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, वनपरिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,शिवसेना विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष कृष्णाजी नागपुरे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अमित गुंडावार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस मुनाज शेख, विदर्भ भोई समाजसेवा महिला संघटन अध्यक्ष रंजना पारशीवे, श्री गुरुदेव प्रचारक विशाल गावंडे. यांची उपस्थिती असणार आहे. सायंकाळी ७ वाजता सप्त खंजिरी राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य कथा दूरदर्शन कलाकार ह. भ. प. तुषार सूर्यवंशी महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल.

      गुरुवार दि.२१ डिसेंबरला सकाळी ६ वाजता श्री ची पूजा व आरती, सकाळी ११ वाजता ह.भ. प. संजयजी शिंदे महाराज यांचे गोपाल काल्याचे किर्तन व दहीहंडी, दुपारी १:३० वाजता श्रीच्या पालखीची प्रमुख मार्गाने भजन दिंडीसह भव्य मिरवणूक व सायं. ६ वाजता प्रशांत शिंदे यांचे सौजन्याने सुमधुर संगीतमय भावभक्तीपर गीतांचा नागपूर येथील जगराता कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता भव्य महाप्रसाद घेण्यात येणार आहे. तरी या ३ दिवसीय भव्य कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये