ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ड्राय डे च्या दिवशी भद्रावतीत अवैध दारू विक्री

भद्रावती पोलिसांची कारवाही : एक महिला सह तीन आरोपींना अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

१ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त

          राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुण्यतिथी असल्याने संपूर्ण दारूचे दुकाने बंद होती मात्र शहरातील दोन ठिकाणी अवैध दारू चालू असल्याने भद्रावती पोलिसांनी धाड टाकून एक महिला सह तीन आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून मोटरसायकल व देशी दारू असा एक लाख ८o हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारला दुपारी अकरा वाजता करण्यात आली.

 यातील प्रज्योत ऊर्फ गोलू अरविंद देवगडे वय २४ राहणार भंगाराम वार्ड , शुमन रमेश गजभिये २५ राहणार चंडिका वार्ड व एक महिला अशी आरोपींची नावे आह. वरील दोन्ही आरोपीनी ड्राय डे असल्याने आपल्या राहते घरी देशी दारूच्या 17 पेट्या आणल्या होत्या याबाबत गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्या आधारे पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सय्यद अहमद, गजानन तुपकर, जगदीश झाडे, निकेश ढेंगे, विश्वनाथ चुधरी यांनी सापडा रचुन ही कारवाई केली त्यांच्याकडील एक लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये