ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

67 व्या राष्ट्रीय शालेय खेळ स्पर्धेत चांदा पब्लिक स्कूलच्या सखी व सृष्टी यांची नेत्रदिपक कामगिरी.

स्पर्धा स्थळी मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रशस्ती पत्र प्रदान करून कौतुक

चांदा ब्लास्ट

ओडिसा राज्य शालेय क्रीडा संघटना आणि एम.ई. विभाग ओडिसा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत 67 वी राष्ट्रीय शालेय खेळ व्हॉलीबॉल स्पर्धा नुकतीच भुवनेश्वर, ओडिशा येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये चांदा पब्लिक स्कूलच्या सखी पांडूरंग दोरखंडे व सृष्टी प्रकाश बल्की सहभागी झाल्या होत्या.

सदरच्या शालेय क्रीडा खेळ स्पर्धेत 14 वर्षाखालील व्हॉलीबॉल स्पर्धेत सी.बी.एस.ई. कडून सखी पांडूरंग दोरखंडे हिने उपांन्त्य फेरीत तामीलनाडू संघाला हारवून अंतीम सामन्यात उत्तर प्रदेश संघावर विजय प्राप्त करीत सी.बी.एस.ई. संघाकडून मोलाची कामगिरी बजावली. यात विशेषतः सखी पांडूरंग दोरखंडे हिने अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला. या अंतिम सामन्यात चांदा पब्लिक स्कूलच्या सखी दोरखंडेने नेत्रदिपक खेळ करीत सी.बी.एस.ई. च्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या यशास्तव विजयी संघातील खेळाडूंना स्पर्धा स्थळी मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रशस्ती पत्र प्रदान करून कौतुक करण्यात आले.

सृष्टी प्रकाश बल्की हिने 14 वर्षाखालील व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत आपली मोलाची कामगीरी बजावली.

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे व प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी विजयी सुवर्णकन्या सखी दोरखंडेचे अभिनंदन करून सत्कार केला. राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी बजावणा-या सखी दोरखंडे व सृष्टी बल्की या यशस्वी पटूंना शाळेतील क्रीडा शिक्षक विनोद निखाडे, अमर कडपेवाले, रमेश कोडारी, जयंती मद्देला, प्रणोती चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले तर विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोलाचे सहकार्य मिळाले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये