ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संकल्प रथाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेचा संदेश

अनेक विभागाच्या योजनांची नागरिकांना माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘आपला संकल्प, विकसित भारत’ जनजागृती रथ काढण्यात आला. या संकल्प रथाचे आगमन जिबगाव येथे झाले. यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. दरम्यान विविध योजनेच्या लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून भारत सरकारच्या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले. जिबगाव ग्रामपंचायतीत संकल्प रथाच्या माध्यमातून नागरिकांना आत्मनिर्भरतेचा संदेश देण्यात आला.

सावली तालुक्यातील भारत सरकारच्या विविध लोकांगीभिमुख योजनेची माहिती देण्यासाठी आलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिनस्त सर्वांचे स्वागत जिबगाव सरपंच पुरुषोत्तम चुदरी, उपसरपंच मोनिकताई उंदिरवाडे, ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार , यांनी केले. यावेळी मंगेश पोळे यांच्यामार्फत विकसित भारताची शपथ देण्यात आली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चलचित्राच्या माध्यमातून संदेशाचे प्रसारण प्रत्यक्ष दाखविण्यात आले.

यावेळी सरपंच पुरुषोत्तम चुदरी, उपसरपंच मोनिकाताई उंदिरवाडे ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार, सौ दिक्षा भोयर.,भक्तदास भोयर.सौ लिलाबाई भोयर.सौ इंदिराबाई भोयर,रसिकाताई मेश्राम उपाध्यक्ष शा. व्य. समिती, अर्चना बारसागडे सदस्य शा. व्य. समितीजिबगांव, दिलीप चुदरी, अशोक पाल,श्री देवतळे विस्तार अधिकारी पं. स.सावली, ग्रामसेवक आकनुरवार जिबगांव,रक्षमवार सर केंद्रप्रमुख जिबगांव,डॉ.लाखे वैद्यकीय अधिकारी प्रा.स्वा. केंद्र लोंढोली, आ से देवकाते उपकेंद्र जिबगांव .आ से चौकुडे उसेगाव,आ से समर्थ हरांबा,मडावी आ सायक लोढोली, कु आशा पुनकटवार सिस्टर,सी ओ चो कु वूषाली थुल हरांबा.सिओचो कु प्रगती रामटेके उसेगांव, अश्विनी चौधरी सिस्टर उसेगांव,कुलमेथे सर प्रा.शा.जिबगाव आरोग्य कर्मचारी आशा वर्कर जिबगांव महीला बचत गट तथा जिबगांव वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये