ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपूर येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकारी नियुक्‍त

आमदार सुधाकर अडबाले यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : नागपूर येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथील पीठासीन अधिकारी पद गेल्‍या १८ महिन्‍यांपासूून रिक्‍त होते. याबाबत मा. उच्च शिक्षणमंत्री, सचिव यांच्याकडे नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी सतत पाठपुरावा केल्‍यानंतर विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे नियमित पीठासीन अधिकारी नियुक्‍त करण्यात आले. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे शासन निर्णय निर्गमित केला.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६ कलम ८१ अन्वये राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणेची स्थापना करण्यात आली आहे. सदर न्यायाधिकरणाची कार्यक्षेत्र ही विद्यापीठ व संलग्नीत खाजगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सेवाविषयक याचिका व अपील याचिका यांचा निपटारा करण्याची तरतुद विषद करण्यात आली आहे. परंतु, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ अमरावती व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कार्यक्षेत्रातील नागपूर स्थित विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथील पीठासीन अधिकारी दि. ३०/१०/२०२४ रोजी सेवानिवृत्त झाल्याने गेल्या १८ महिन्यांपासून नियमित अधिकारी नियुक्त केलेले नव्‍हते.

याबाबत अामदार सुधाकर अडबाले यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, सचिव श्री. रेड्डी यांच्याकडे सतत पत्र व्‍यवहार व प्रत्‍यक्ष भेटी घेऊन पाठपुरावा केला. त्‍यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पीठासीन अधिकारी पदावर न्‍यायमूर्ती श्रीमती मुकुलिका श्रीकांत जवळकर (मा. उच्च न्‍यायालय, मुंबई) यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्‍ती करण्यात येत असल्‍याचा शासन निर्णय निर्गमित केला.

पिठासीन अधिकारी नियुक्‍त केल्‍यामुळे खाजगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आमदार सुधाकर अडबाले यांचे आभार मानले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये