ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यापीठाच्या अविष्कार मध्ये महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी अव्वल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे दिनांक २०/२१ डिसेंबर २०२३ ला अंतर महाविद्यालयीन संशोधन संमेलन अविष्कार चे आयोजन केले होते. संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पाठविण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले होते. कोरपना तालूक्यातील गडचांदूर येथील महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयातील चार विद्यार्थी या संशोधन संमेलनात सहभागी झाले होते. यापैकी सुमित पांडे ऍग्रीकलचर, व हजबंडरी क्षेत्रात प्रथम तर बादल गोतमुकले हा प्युअर सायन्स विषयावर उत्कृष्ट सादरीकरण केल्यामुळे तिसऱ्या क्रमांकांवर यशस्वी झाले आहेत.

येत्या 12 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान आरोग्य विज्ञान महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे प्रतिनिधित्व सुमित पांडे हा विद्यार्थी करणार आहे.

सुमित हा महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय गडचांदूर चा विद्यार्थी असून महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ अजय कुमार यांनी विशेष प्रयत्न केले. प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये