ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरातील कोळसा तथा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक यांच्या चंद्रपूर व नागपूर कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी ; घरातील व कार्यालयातील भ्रमणध्वनी ताब्यात

चांदा ब्लास्ट

शहरातील कोळसा तथा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक चढ्ढा यांच्या चंद्रपूर एमआयडीसीतील कार्यालय तथा नागपुरातील कार्यालयावर एकाच वेळी आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा टाकल्याने कोळसा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या छाप्यात काही कच्च्या व्यवहाराच्या पावत्या मिळाल्याची माहिती आहे. आयकर विभागाच्या पथकाने नागपुरातील व्यावसायिकांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी छापे टाकले होते. तेव्हा तिथे चढ्ढा यांच्या सोबतच्या कच्च्या व्यवहाराच्या पावत्या मिळाल्या होत्या. याच पावत्यांच्या आधारावर माहिती गोळा केल्यानंतर आयकर विभागाने बुधवारी पहाटेच्या सुमारास चढ्ढा यांच्या चंद्रपूर एमआयडीसी येथील कार्यालय तथा नागपुरातील कार्यालय, निवासस्थान येथे छापा टाकला. यावेळी घरातील व कार्यालयातील सर्वांचे भ्रमणध्वनी ताब्यात घेण्यात आले. तसेच कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

मागील आठ ते दहा वर्षांपासून चढ्ढा कोळसा व्यवसायात आहेत. सर्व व्यवहारांचीही तपासणी केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये