ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मा. ना. धर्मराव बाबा आत्राम ह्यांच्या उपस्थिती मध्ये अनेक प्रश्न मार्गी लागले

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री मा ना धर्मराव बाबा आत्राम साहेब ह्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यां सोबत चंद्रपूर येथील शासकीय विश्राम गृह येथे बैठक घेण्यात आली ह्या बैठकी मध्ये चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्यांनी उभ्या राहणाऱ्या ट्रॅव्हल्स व शोरूम समोर उभ्या असणाऱ्या गाड्या ह्या वर कायमचा बंदोबस्त कारावा आणि wcl मध्ये कार्यरत कंत्राटी कामगार ह्याच्या समशे बद्दल माहिती दिली

त्या वर Sdpo नंदनवार साहेब ह्यांनी महानगरपालिका आयुक्त ह्यांच्या शी चर्चा करून 15 दिवसात ट्रॅव्हल्स पार्किंग साठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आणि 15 दिवसा नंतर अवैध ट्रॅव्हल्स वर IPC कलम 283 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले जाईल असे सांगण्यात आले तसेच शासनाच्या नियमानुसार कामगारांना 8 तास ड्युटी व अन्य फायदे देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले

ग्रामीण अध्यक्ष नितीन भटारकर ह्यांनी शासकीय रुग्णालय मध्ये होणाऱ्या गैरसोयी बद्दल माहिती तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समशे चे निराकरण करण्या करिता विनंती केली ह्या वर तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले

ह्या बैठकीला जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील व शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये