ताज्या घडामोडी

शहरात येणार रामजन्मभूमी मंदिर अक्षदा कलश – कलश शिभायात्रेने राजुरा नगरी होणार भक्तिमय

सर्व राम भक्तांनी कलश दर्शन - पुजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

हजारो वर्षांच्या वनवासानंतर अखेरीस मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रामजन्मभूमी मुक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्याचे सुरू असलेले पुण्य कार्य पूर्णत्वास येत असुन 14 जानेवारी पासुन सुरू होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी संपन्न होणार आहे. ह्या पावन पर्वाच्या औचत्याने देशभरातील रामभक्तांना अयोध्येत जाण्याचे वेध लागले असले तरीही विविध कारणांनी बहुतांश भक्तांना राम जन्मभूमीचे पावन दर्शन त्या दिवशी घेणे शक्य होणार नसल्याने राम मंदिर न्यासाच्या संकल्पनेतून अयोध्या येथे रामजन्मभूमी वर पुजित पावन अक्षदा भक्तांना प्रसाद रुपात वितरित करण्यात येणार आहे.

ह्याच अभियानाअंतर्गत राजुरा शहरातही पुजीत अक्षदा कलश आणण्यात येत असुन दिनांक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:00 वाजताच्या सुमारास अक्षदा कलशाचे आगमन होत आहे.

 

 

अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात भगवान रामललाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला केली जाणार आहे. याच अनुषंगाने श्रीराम जन्मभूमी येथील प्राणप्रतिष्ठा सोहळा हा हिंदूंच्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येच्या स्वप्नपूर्तीचा भाग असून या सोहळ्यात सर्व हिंदूंनी सहभागी करण्यासाठी अक्षता कलश वितरण अभीयांनाच्या माध्यमातून गावागावातील,वस्तीतील प्रत्येक घरी पोहचायचे नियोजन झाले असून हा सोहळा सर्वोत्तम झाला पाहिजे या करिता श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या पूजित अक्षता कलश यात्रेचे आयोजन राजुरा शहरात दि.२२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात आले आहे. या यात्रेची सुरुवात जुने बसस्थानक श्रीराम मंदिर येथून होणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-नेहरू चौक-गांधी चौक-भारत चौक पासून भवानी मंदिर राजुरा येथे समारोप होईल. या अक्षीदा कलश यात्रेत मोठ्यासंख्येने रामभक्त यांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या समिती राजुरा च्या वतीने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये