ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महावितरणचे मानव संसाधन विभाग प्रमुख, मुख्य महाव्यवस्थापक, मुंबई यांची चंद्रपूर परिमंडळात आढावा बैठक

आधुनिक युगात पेपर विरहित कामे व कर्मचाऱ्याच्या प्रश्नांची सोडवणूक करून कंपनीची प्रतिमा सुधारा - मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) भूषण कुलकर्णी

चांदा ब्लास्ट

महावितरणचे मानव संसाधन विभाग प्रमुख, मुख्य महाव्यवस्थापक, (सांघिक कार्यालय) मुंबई यांची आज चंद्रपूर परिमंडल कार्यालयात, महावितरण नागपूर प्रादेशिक कार्यालय अंतर्गत विदर्भातील चंद्रपूर परिमंडलातील मानव संसाधन विभागाची विशेष आढावा बैठक पार पडली. चंद्रपूर परिमंडलातील (चंद्रपूर व गडचिरोली मंडळ) मानव संसाधन विभागातील सर्व विभागप्रमुख सहाय्यक महाव्यवस्थापक,वरिष्ठ व्यवस्थापक, व उपव्यवस्थ्यापक या बैठकीस उपस्थित होते. चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी श्री. भूषण कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले तसेच चंद्रपूर परिमंडळांतर्गत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. भूषण कुलकर्णी यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

महावितरण कर्मचारी हा कंपनीचा पाया आहे. महावितरण कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक पातळीपर्यंत पाठपुरावा करुन संपर्क साधावा असे ते याप्रसंगी बोलले. महावितरण कंपनीत उत्कुष्ट कार्य करणाऱ्या अधिका-यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांचे मनोबल उंचावले. चंद्रपूर परिमंडलाने सरळसेवाद्वारे भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे रोस्टर १०० टक्के पूर्ण केल्याबदल श्री भूषण कुलकर्णी यांनी चंद्रपूर परिमंडलाचे सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. रामचंद्र वैदकर, चंद्रपूर परिमंडलाचे वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन ) श्री सुशिल विखार व सहकारी यांचे विशेष कौतूक केले. व सर्वांनी असेच उल्लेखनीय कार्य करण्याचे आवाहन श्री भूषण कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी परिमंडल कार्यालयांतर्गत शिस्तभंग कारवाई, उच्चवेतन श्रेणीला मंजुरी प्रकरणी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत, कर्मचारी पेंशन वारसा, नामनिर्देशन व अनुकंपा तत्वावरील प्रलंबित प्रकरणाबाबात आढावा घेण्यात आला. चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी यावेळी, कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

या विशेष आढावा बैठकप्रसंगी बोलतांना मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. भूषण कुलकर्णी म्हणाले, की अनुकंपा तत्वावरील प्रलंबित प्रकरणे, कर्मचारी निलंबन प्रकरणे, बिंदू नामावली नोंदणी प्रकरणे, कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल प्रकरणे, कर्मचारी सेवा निवृत्ती उपदान प्रकरणे, वार्षिक वेतनवाढ प्रकरणे, पदोन्नती पॅनेल, विद्युत सहाय्यक समावेशन प्रकरणे, सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे, वैद्यकीय देयके प्रकरणे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी नामांकन इत्यादी प्रकरणांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित प्रकरणी अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीपर्यंत संवाद साधून व पाठपुरावा करून कागदपत्रांची पूर्तता करावी. सदर प्रकरणे तात्काळ निपटारा करून महावितरण कंपनीची प्रतिमा सुधारावी असे आवाहन केले.

फोटो ओळ -महावितरण नागपूर प्रादेशिक कार्यालय अंतर्गत चंद्रपूर परिमंडलातील मानव संसाधन विभागाची विशेष आढावा बैठक प्रसंगी मुख्य कार्यालयाचे मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री भूषण कुलकर्णी, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री सुनिल देशपांडे, नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. रुपेश देशमुख सहा. महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री रामचंद्र वैदकर, सहायक महाव्यवस्थापक, चंद्रपूर परिमंळाचे वरीष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन ) श्री सुशिल विखार हे प्रामुख्याने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये