ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाजकार्य विद्यार्थ्यांनी जिल्हा क्षयरोग केंद्र व एन.एच.एम विभाग, चंद्रपूर येथे दिली भेट

क्षयरोग केंद्र व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जाणून घेतले कार्य

चांदा ब्लास्ट

 स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथील एम.एस.डब्ल्यू व्दितीय वर्षाच्या वैद्यकिय व मन: चिकित्सक समाजकार्य विशेषीकरणाच्या विद्यार्थ्यांनी बुधवार दिनांक ६ डिसेंबर ला जिल्हा क्षयरोग केंद्र व एन.एच.एम विभाग, चंद्रपूर येथे भेट दिली.
एन.एच.एम. म्हणजेच राष्ट्रिय आरोग्य अभियान. या अभियानाद्वारे बाल आणि माता मृत्युदर कमी करणे, अन्न आणि पोषण, स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी सार्वजनिक सेवांमध्ये सार्वत्रिक प्रवेश आणि महिला आणि मुलांचे आरोग्य आणि सार्वत्रिक लसीकरण संबंधी सेवांवर भर देऊन सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये सार्वत्रिक प्रवेश मिळवून देणे हे कार्य केले जाते.
जिल्हा क्षयरोग केंद्र, चंद्रपूर येथे क्षयरोगाच्या रुग्णांवर मोफत उपचार केल्या जाते. त्यांना मासिक आर्थिक सहाय्य शासनाच्या वतीने केले जाते व वेळोवेळी या केंद्रात आवश्यक सुविधा रुग्णांना मिळवून दिल्या जाते.
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  पराग जीवतोडे , संतोष छत्रेव्वार,  यांनी समाजकार्य विद्यार्थ्याना माहिती दिली.
संस्था भेट समन्वयक प्राचार्य डॉ. जयश्री कापसे व प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी एक्सप्लोझर संस्था भेटी देत आहेत. यावेळी संचालन संगिता भोयर व आभार भैरव मडावी याने व्यक्त केले.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये